अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह ५ मार्च रोजी अकोल्यात येणार आहेत. सहा लोकसभा मतदारसंघातील संचलन समिती, लोकप्रतिनिधी व जिल्हा पदाधिकाऱ्यांसह निवडक ६०० जणांना लोकसभा पूर्वतयारीची माहिती घेऊन बैठकीसाठी बोलावले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यात भाजपने सुरुवातीपासून आघाडी घेतली. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पश्चिम विदर्भातील भाजपचा गड म्हणून ओळख असलेला अकोला लोकसभा मतदारसंघात देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह येणार आहेत.

हेही वाचा…नागपूरमध्ये भाजयुमोचा राष्ट्रीय मेळावा, ऐनवेळी जे.पी. नड्डा यांचा दौरा रद्द

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत. पक्षाच्या संचलन समितीच्या कामकाजाची माहिती घेऊन ते भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार रामदास तडस, खासदार अनिल बोंडे, २० आमदार उपस्थित राहतील.

अमित शाह यांचे ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शिवणी विमानतळावर संभाजीनगरवरून आगमन होईल. एका खासगी हॉटेलमध्ये ११.३० वाजता बैठक सुरू होणार असून १.३० वाजेपर्यंत ही बैठक चालेल. त्यानंतर अमित शाह व भाजप नेते जळगावकडे प्रस्थान करणार आहेत.

हेही वाचा…video : ताडोबा महोत्सवात दोन वाघांची मारुतीला प्रदक्षिणा

अकोल्यात अमित शाह यांचा ‘रोड शो’

शहरातील जनतेशी संवाद साधण्याच्या दृष्टीने अमित शाह यांचा ‘रोड शो’ होणार आहे. त्यासाठी भाजप व मित्र पक्षाने नियोजन केले असून त्यांचे शहरात आठ ठिकाणी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली.

हेही वाचा…आता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा होणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘हा’ मोठा बदल

देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह ५ मार्च रोजी अकोल्यात येणार असून ते विदर्भातील सहा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या स्वागताची पक्षाच्यावतीने तयारी केली जात आहे. – आमदार रणधीर सावरकर, प्रदेश सरचिटणीस, भाजप, अकोला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah to visit akola review bjp s preparations in vidarbha for lok sabha elections ppd 88 psg