वर्धा : एखाद्या समूहास प्रसिद्ध व्यक्तीचे नाव जुळले की पुढे तीच त्या समूहाची कायमची ओळख बनते. मग त्या व्यक्तीचा संबंधित समूहाशी संबंध असो की नसो. आता ईथे तसेच आहे. फार्मास्यूटिकल म्हणजे औषधी निर्माण क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून आयपीसीए या कंपनीची ओळख आहे. या इंडियन फार्मास्यु्टिकल कंबाईन असोसिएशन लिमिटेड कंपनीची मालकी विख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे होती. १९७५ मध्ये त्यांचा ५० टक्के व इतर दोघांचे प्रत्येकी २५ टक्के हिस्सा असणारी ही कंपनी त्यांनी विकत घेतली होती. पुढे बच्चन हे या कंपनीतून १९९८ मध्ये बाहेर पडले. त्यानंतर सह संस्थापक प्रेमचंद गोधा यांनी आयपीसीएच्या भारतातील ३० युनिटचा विस्तार केला. ही आता ८ हजार कोटी रुपयाची उलाढाल करणारी कंपनी बनली आहे. याच कंपनीने वर्धा जिल्ह्यातील हिंगणी येथील नोबल एक्स्प्लॉसिव ही कंपनी राष्ट्रीय लवादा मार्फत विकत घेतली आहे. त्याचे सर्व ते सोपस्कार पूर्ण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंगणी येथील या पडीत कंपनीचा ताबा घेतल्यानंतर आता ही कंपनी चाचणी उत्पादन घेण्यास सज्ज असल्याचे गोधा यांनी जाहिर केले आहे. कंपनी या ठिकाणी २५० कोटी रुपयाची गुंतवणूक करीत आहे. ७०० एकरचा परिसर असलेल्या कंपनीत औषधीचे उत्पादन होणार. नवा कारखाना हा पूर्णतः हरित ऊर्जेवर चालणार. बॉयलर युनिट हे कृषी कचऱ्यावर आधारित गोळ्यांवार पेट घेणार. त्यामुळे ते या विभागातील पहिले असे पूर्णपणे हरित फार्मा युनिट ठरले आहे. तसेच कोळश्याचा वापर कमी करणारी पेलेट आधारित बॉयलर प्रणाली असणार. सौर ऊर्जा प्रकल्प पुढील वर्षी कार्यन्वित होणार आहे.प्रारंभी २५० संख्येत मनुष्यबळ राहणार. या नव्या उद्योगात क्लोरोक्वीन गोळया, इंजेक्शन व सिरप उत्पादन होणार. हे असे उत्पादन औषध निर्मिती क्षेत्रात भारताचे वर्चस्व सिद्ध करणार असल्याचा दावा कंपनी करते. चिनने औषधी उत्पादन कमी केल्याने भारत औषधी पुरवठा करण्यात आघाडीस राहणार.

नोबल एक्स्प्लॉसिव्ह असतांना त्यात कामगार नेते म्हणून आपली संघटना चालवीणारे मिलिंद देशपांडे हे म्हणतात की आयपीसीए या कंपनीचा अधिकृत ताबा झाला आहे. ताबा देण्यापूर्वी लवादाने कामगार देणी व अन्य सोपस्कार पूर्ण केले होते. आमची एक विनंती होती की कर्मचाऱ्यांना कायम ठेवावे. पण बराच काळ निघून गेल्याने कर्मचारी वयोमर्यादा संपली आहे. पण त्यांच्या पाल्यांना नव्या कंपनीने सामावून घ्यावे, असा प्रयत्न सूरू आहे. कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक विशाल यांच्याकडून अधिक माहिती घेण्यास प्रतिसाद मिळाला नाही.