नागपूर : उपराजधानीत सोमवरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असली तरी राज्यभरातील आमदार रविवारपासूनच शहरात आले आहेत. त्यातही अर्ध्याअधिक आमदारांनी निवासासाठी हॉटेलकडे धाव घेतली असली तरीही अजूनही काही आमदार निवासासाठी आमदार निवासालाच पसंती देत आहेत. मात्र, या आमदार निवासालाच असुविधेचा विळखा बसल्याने आम्ही राहायचे कुठे असा प्रश्न आमदारांनी विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासाला बसलेल्या असुविधेचा पाढाच सभागृहात वाचला. इतर आमदार राहात असतील शहरातील हॉटेलमध्ये, पण आम्ही आमदार निवासातच राहतो. इथे सातत्याने वीज खंडित होत आहे. स्वच्छतेपासून तर असुविधेचा पाढा जितका वाचला तितका कमी आहे. वीज खंडित झाल्याने गरम पाण्याचे गिझर बंद आहे. एकीकडे नागपूरचा किमान तापमानाचा पारा घसरला असताना उपराजधानीतील या कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ करायची का, असा प्रश्न यावेळी मिटकरी यांनी उपस्थित केला. त्यावर अनिल परब यांनीही गेल्या तीन दिवसांपासून आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद असल्याचे सांगितले. मिटकरी आजची गोष्ट करत आहेत, पण गेल्या तीन दिवसांपासून आल्यापासून मी या समस्येचा सामना करतोय. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी याबाबत याआधीही अनेक तक्रारी आल्या आणि यावर आधीच चर्चा झाली आहे, त्यामुळे उगाच प्रसिद्धी नको, असे सांगितले.

हेही वाचा – Ravi Rana : रवी राणांची नाराजी कायम; अधिवेशनात उपस्थित न राहता गोसेवेत व्यस्त

u

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात हिवाळी अधिवेशन होत आहे, पण आमदार निवास अजूनही सुधारलेले नाही. आमदार निवासामध्ये आमदार कमी आणि त्यांचे समर्थक जास्त राहतात. आमदारांच्या अल्प मुक्कामामागील एक कारण म्हणजे आमदार निवासातील खोल्या हायटेक नाहीत. आमदारांना प्रथमदर्शनी आवडलेल्या अशा हायटेक खोल्या बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे. आमदार निवास इमारत क्र. २ तळमजला आणि पहिल्या मजल्यावर सॅम्पल रूम तयार केल्या आहेत, ज्या पंचतारांकित हॉटेलच्या खोल्यांपेक्षा कमी नाहीत’ असा दावा बांधकाम विभागाने केला असला तरी या तक्रारीनंतर हा दावा फोल ठरला आहे.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ ९ रेल्वे रद्द…

आमदाराबद्दल बोलायचे झाले तर एसी, गरम पाणी, हायटेक टॉयलेट, बाथरूम, किचन याशिवाय दोन बेड असतील. खोली पूर्णपणे सुसज्ज आहे आणि वीज व्यवस्था हायटेक आहे. छतावर लावलेले पीओपी दिवे खोलीच्या सौंदर्यात भर घालतात. मात्र, हा देखील दावा फोल ठरला आहे. दरम्यान, १८३ रूम हायटेक करण्याचा प्रस्ताव आहे. ते हायटेक आणि पंचतारांकित हॉटेलप्रमाणे बनविन्यासाठी कमीत कमी २३ कोटींचा खर्च लागेल. जीएसटी पकडून प्रत्येक खोलीमागे २० ते २५ लाख रुपये खर्च येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari grievance amdar niwas nagpur winter session nagpur rgc 76 ssb