मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात खडाजंगी सुरू आहे. अशातच छगन भुजबळांनी खोटे कुणबी दाखले देण्याचं काम सुरू असल्याचं आरोप केला होता. यावर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“आम्हाला पूर्वीचे कुणबी दाखले मान्य आहेत. पण, माजी न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरत आहे. आणि खोटे कुणबी दाखले देण्याचं काम सुरू आहे,” असं विधान छगन भुजबळांनी केलं होतं.

amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Allegations against Amit Shah baseless The Ministry of Foreign Affairs informed the High Commission of Canada
‘अमित शहांवरील आरोप निराधार’; परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तालयाला सुनावले
Amit Shah claim regarding agitations and prices of agricultural commodities
कॅनडाच्या अमित शाह यांच्यावरील आरोपाला भारत सरकारचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पातळीवर…”
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा
CM Eknath Shinde on Arvind Sawant Statement about Shaina NC
CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”
maharashtra irrigation scam
विश्लेषण: सिंचन घोटाळा काय होता? त्यात अजित पवारांविरुद्ध गुन्हा का नाही?

“नागपूरमधील राजे भोसले हे कुणबी”

यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र भेटत आहेत. मी स्वत: मराठा समाजाच्या संदर्भात अनेक कुणबी दाखले दिले आहेत. नागपूरमधील राजे भोसले हे कुणबी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्कालीन इतिहासातील संदर्भात कुणबी हा उल्लेख आढळतो.”

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय द्यावा”

“त्यामुळे मराठा समाजाची मागणी रास्त आहे. पण, आमच्या पक्षाची भूमिका ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,” असं मिटकरींनी सांगितलं.

“मी ओबीसी समाजाचा एक घटक”

भुजबळांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारल्यावर अमोल मिटकरींनी म्हटलं, “दोन्ही समाजाकडून तेढ निर्माण होतील, अशी वक्तव्य करता कामा नये. तसेच, जरांगे-पाटील आणि भुजबळांनी एकमेकांवर टीका करू नये. मी एका कुणा एका समाजाची बाजू घेत नाही. मी ओबीसी समाजाचा एक घटक आहे.”