अमरावती : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही करण्यात आले. तिच्या तोंडात व डोळ्यात वाळू टाकून तिला चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्‍याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय प्रकाश खांडे (२५), राजेश शंकर कोहळे (३०), काल्या उर्फ आकाश जगदीश पिल्लारे (३०) व शिवाजी बंडू चौधरी (२७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी ही २९ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातीलच एका किराणा दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी शिवाजी चौधरी याने तिला आवाज दिला. तुला आजीकडे सोडून देतो, अशी बतावणी करून त्याने तिला दुचाकीवर बसविले. मात्र, तो तिला आजीकडे न नेता गावाहून थोड्या दूर अंतरावर एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही करण्यात आले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपींनी तिच्या तोंडात व डोळ्यांत वाळू टाकली. त्यानंतर आरोपींनी तिला चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्नदेखील केला. त्यांनी तिचा गळासुद्धा आवळला. तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने पीडित मुलगी प्रचंड घाबरली. तिने अनेक दिवस वाच्‍यता केली नाही, पण त्यानंतर स्वत:ला सावरत तिने चांदूर रेल्वे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना मंगळवार, ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले.

हेही वाचा…“नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, ती अक्कल महायुती सरकारमध्ये…,” नाना पटोलेंची टीका

१९९५ च्‍या शासन निर्णयानुसार महाराष्‍ट्र राज्‍य पोलीस मुख्‍यालय याठिकाणी महिला अत्‍याचार प्रतिबंधक विभागाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. राज्‍यामध्‍ये महिलाविरूध्‍द गुन्‍हयास प्रतिबंध करणे, गुन्‍हे उघडकीस आणणे व गुन्‍हयांचा तपास करणे इत्‍यादी कामे संबंधीत पोलीस ठाण्‍याकडून केले जातात. महिलाविरूध्‍द प्रकरणे हाताळण्‍यासाठी सर्व पोलीस ठाण्‍यामध्‍ये महिला पोलीस कक्षाची निर्मिती करण्‍याबाबत पोलीस महासंचालकांनी परिपत्रक जारी केले आहे. महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांची उपलब्‍धतेनुसार या कक्षामध्‍ये नेमणूक करण्‍यात आली आहे. एकूण ९७५ महिला पोलीस कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहेत.

हेही वाचा…“रन अँड हिट प्रकरणात कोणालाही पाठीशी घेतली जाणार नाही…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तक्रारीवरून चौघांविरुद्ध सामूहिक अत्याचार, जिवे मारण्याचा प्रयत्न, पोक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. चारही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. – अजय अहिरकर, ठाणेदार, चांदूर रेल्वे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati 16 year old girl kidnapped gang raped and subjected to unnatural act four accused arrested mma 73 psg
Show comments