अमरावती महाराष्‍ट्रात पराभवाची जबाबदारी स्‍वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा देण्‍याची तयारी दर्शविलेली असताना दुसरीकडे, अमरावतीत भाजपचे शहराध्‍यक्ष आमदार प्रवीण पोटे यांनी देखील अमरावती लोकसभा मतदार संघातील भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या पराभवाची नैतिक जबाबदारी स्‍वीकारून पदाचा राजीनामा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडे पाठवला आहे.लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघात झालेल्‍या पराभवाची नैतिक जबाबदारी म्‍हणून अमरावती शहर अध्‍यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तरी राजीनाम्‍याचा स्‍वीकार करावा, ही विनंती, असे दोन ओळींचे राजीनामा पत्र प्रवीण पोटे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ई-मेल द्वारे बुधवारी सायंकाळी पाठवले. या पत्रावर अजून कोणताही निर्णय घेण्‍यात आलेला नाही.

हेही वाचा >>> भावना गवळींचे तिकीट कापणे शिंदे सेनेच्या अंगलट, हा निकाल युतीसाठी धोक्याची घंटा

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Bhokardan Constituency Assembly election 2024 BJP Santosh Danve Chandrakanta Demons print politics
लक्षवेधी लढत: भोकरदन : लोकसभेतील पराभवानंतर दानवेंची प्रतिष्ठा पणाला
shweta mahale vs congress rahul bondre
चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव

अमरावती मतदार संघात नवनीत राणा यांचा कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी पराभव केला आहे. अमरावतीतून नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्‍याच्‍या दोन दिवस आधी अमरावतीतील भाजपच्‍या नेत्‍यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘काहीही करा, पण नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका’, असे साकडे घातले होते. नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला विरोध करणा-या नेत्‍यांमध्‍ये प्रवीण पोटे यांचाही समावेश होता. प्रवीण पोटे हे विधान परिषद सदस्‍य आहेत.

हेही वाचा >>> फडणवीसांकडून राजीनाम्याच्या तयारीचे पडसाद उमटणे सुरू, समर्थकांनी सामूहिक…

प्रवीण पोटे आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍यात यापुर्वी अनेकवेळा खटके उडाले आहेत. प्रवीण पोटे हे जिल्‍ह्याचे पालकमंत्री असताना रवी राणा यांनी त्‍यांचा उल्‍लेख ‘बालकमंत्री’ असा करून त्‍यांच्‍यावर टीका केली होती. ही टीका प्रवीण पोटे यांच्‍या समर्थकांच्‍या चांगलीच जिव्‍हारी लागली होती. नवनीत राणा यांना उमेदवारी घोषित झाल्‍यानंतर मात्र प्रवीण पोटे यांनी मतभेद संपुष्‍टात आल्‍याचे जाहीर केले होते. रवी राणांनी आमच्‍या सर्व कार्यकर्त्‍यांची माफी मागितली आहे. आम्‍ही आता नवनीत राणा यांच्‍या विजयासाठी शर्थीचे प्रयत्‍न करू, असे प्रवीण पोटे यांनी सांगितले होते. उद्धव ठाकरे हे मुख्‍यमंत्री असताना त्‍यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्‍न करण्‍याचे धाडस नवनीत राणा यांनी केले, खरेतर हे काम माझ्यासह भाजपमधील सर्वांनी करायला हवे होते, पण ते आम्‍ही करू शकलो नाही, अशा शब्‍दात प्रवीण पोटे यांनी नवनीत राणांची स्‍तुतीही केली होती. एकीकडे, उपमुख्‍समंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्‍याची तयारी दर्शविलेली असताना प्रवीण पोटे यांचा राजीनामा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्‍वीकारणार का, याकडे पोटे समर्थकांचे लक्ष लागले आहे.