अमरावती : महाविकास आघाडी सरकारच्‍या काळातही महिलांवरील अत्‍याचाराच्‍या अनेक घटना घडल्‍या. त्‍यावेळी आम्‍ही सर्व सरकार म्‍हणून त्‍यांच्‍या पाठीशी उभे राहिलो. आम्‍ही विरोधी पक्षात होतो, पण अशा गंभीर घटनांमध्‍ये आम्‍ही राजकारण केले नाही. अशावेळी सरकारच्‍या पाठीशी उभे राहिले पाहिजे, आणि अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना त्‍यांचे राजकारण लखलाभ असो, असा टोला भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्याजवळ भाजपच्‍या वतीने ‘जाणीव जागर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ambadas Danve on ST Bus Ticket Price Hike
Ambadas Danve : एसटीच्या तिकीट दरात वाढ, ठाकरे गट आक्रमक; अंबादास दानवेंनी दिला ‘हा’ मोठा इशारा
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
Uddhav Thackeray-Sharad Pawar meeting,
उद्धव ठाकरे-शरद पवार यांची भेट, महाविकास आघाडीची लवकरच बैठक होणार
Pradesh Youth Congress protested in Nagpur deciding to relieve 60 office bearers
संघविरोधी आंदोलन भाग न घेतल्याने वडेड्डीवार, ठाकरे, धवड युवक काँग्रेसमधूम पदमुक्त,संघटनेच्या कामात कसूर केल्याचा ठपका

हेही वाचा…सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात अडकविण्यासाठी करतायेत तरुणींचा वापर; दिवसाला शेकडोंवर…

बावनकुळे म्‍हणाले, अशा घटनेला राजकीय घटना म्हणून पाहू नये. राजकारण करण्यासाठी खूप विषय महाराष्ट्रामध्ये आहेत. ज्या कुटुंबाला आपण न्याय देण्याकरता बोलतो आहे, त्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे. इतक्या घटना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारच्‍या काळामध्ये घडल्या. पण आम्ही सर्वांनी त्या काळात सरकार म्हणून त्यांच्यासोबत उभे राहिलो.

बावनकुळे म्‍हणाले, लवकरात लवकर सरकारने आपले सर्व अधिकार वापरुन या घटनेमध्ये दोषी असणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी व्‍यवस्‍था करायला हवी. ही शिक्षा अत्यंत तातडीने झाली पाहिजे, अशी मागणी आम्‍ही सरकारकडे केली आहे. आमची पक्ष म्हणून निश्चितपणे जबाबदारी आहे आणि जे जे काही पक्ष म्हणून आम्हाला करायचे आहे ते करु. या प्रकरणाचा आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करू. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही काम करणार आहोत.

हेही वाचा…राज ठाकरे म्हणतात “लाडकी बहीण योजना लवकरच बंद…”

बावनकुळे म्‍हणाले, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरच्‍या प्रकरणात झालेली संपूर्ण कारवाई माध्‍यमांसमोर आणि जनतेसमोर मांडली आहे. संपूर्ण महाराष्‍ट्रातील जनता, सरकार पीडित कुटुंबीयांच्‍या सोब‍त आहे. भाजपच्‍या वतीने जाणीव जागर या कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून समाजात जनजागृती करण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला आहे. भविष्‍यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वांना सोबत घेतले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही. हा अत्‍यंत संवेदनशील विषय आहे. ज्‍या पद्धतीने विरोधी पक्षाकडून या प्रकरणी राजकारण करण्‍यात येत आहे, ते चुकीचे आहे. अशा प्रकारच्‍या घटना पुन्‍हा घडू नयेत, यासाठी उपाययोजना करायला हव्‍यात, असेही बावनकुळे म्हणाले.

Story img Loader