अमरावती : शेअर बाजारात गुंतवणुकीच्‍या नावाखाली परतवाडा येथील एका व्‍यक्‍तीची ३१ लाख ३५ हजारांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी सहा आरोपींना ग्रामीण सायबर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामुळे आरोपी अटक संख्या आता दहावर पोहोचली आहे.

रितेश अरुणकुमार अजंगले (२४) रा. ठठारी, मायकल खेमलाल साहू (२४) रा. जैजैपुर, रवींद्र राजेंद्र यादव (२९) रा. बसंतपूर, अमन महादेव हरपाल (३८) रा. कातुल बोर्ड, शैलेंद्रसिंग नारायणसिंग चव्हाण (३५) रा. भरकापारा व दिगंत शशिकांत अवस्थी (३८) रा. बनभेडी, छत्तीसगड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

हेही वाचा…चंद्रपूर : धक्कादायक! तीन दिवस वाघाच्या अवयवांचे तुकडे करून जाळले…

परतवाड्यातील घामोडिया प्लॉट येथील रहिवासी आशिष महादेवराव बोबडे (४४) हे समाज माध्‍यमावरील ‘फोर्थ इंडियन स्टॉक मार्केट ॲनालिसीस ॲण्ड लर्निंग’ या शेअर बाजाराशी संबंधित समूहाचे सदस्‍य बनले. त्यावर आलेल्या लिंकवर क्लिक केल्‍यानंतर त्यांनी त्यावर युझर आयडी व पासवर्ड बनविला. त्यानंतर संकेतस्‍थळावरील लिंकद्वारे त्यांनी ३१ लाख ३५ हजार रुपयांचे शेअर खरेदी केले.

दरम्यान, पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते संकेतस्‍थळ बंद दिसून आले. त्यामुळे त्यांनी समूहामधील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, मोबाइलही बंद होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी परतवाडा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

हेही वाचा…सावधान ! उपराजधानीत वाढला बिबट्याचा वावर

सायबर पोलीसही या गुन्ह्याचा तपास करीत होते. आरोपी वेगवेगळे मोबाइल वापरत असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यांनी एकमेकांशी संपर्क साधून तपास यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सदर बँक खात्यांची साखळी जोडून प्राप्त तपशीलाच्या आधारावर छत्तीसगडमधील जांजगीर, रायपूर, सक्ती येथून चार आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीदरम्यान अन्य आरोपींचा सुगावा लागल्यावर त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्तीसगढला रवाना झाले होते.

तेथून पोलिसांनी रितेश अजंगले, मायकल साह, रवींद्र यादव, अमन हरपाल, शैलेंद्रसिंग चव्हाण व दिगंत अवस्थी यांना अटक केली. गुन्ह्याच्या तपासात आरोपींने वापरलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ७० लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. आरोपींकडून बँकेचे ३ स्टॅम्प, प्रोपरायटर ३ स्टॅम्प, सरपंच यांचे नावे स्टॅम्प, १७ डेबिट कार्ड, वेगवेगळ्या बँकेचे ७४ धनादेश, ६० पासबुक व १ लाख २ हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा…निवडणूक व्यवस्थापनात तज्ज्ञ नागपूरकर नेत्यांकडे काँग्रेसने दिली नवी जबाबदारी

ही कारवाई सायबरचे पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण औटे व निर्मला भोई, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोड, पंकज गोलाईतकर, सागर धापड, रितेश गोस्वामी, रोशन लकडे, गौरव गनथडे, प्रिया मुंडेकर आदींनी केली.

Story img Loader