अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विद्युत पुरवठा ३ तासांपासून खंडीत झाला आहे. यामुळे विविध आजारांचे रुग्ण आणि गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागत असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या रुग्णांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट घेत चौकशी केली. “१-१ दिवसांची बालके घेऊन महिला वॉर्डच्या बाहेर बसल्या आहेत. तुम्हाला हे भोगावं लागणार,” असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “जिल्हा रुग्णालयाकडे प्रशासन, शासन, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे. १-१ दिवसांची बालके घेऊन गरोदर महिला बाहेर बसल्या आहेत. उद्या एखाद्या बालकाचा जीव जाईल. ठाण्यात १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत.”

हेही वाचा : “अजित पवार यांची दया येते, कारण ते कायम…”, भगतसिंह कोश्यारींचं विधान चर्चेत

“सगळीकडे भ्रष्टाचार सुरु आहे. रुग्ण कल्याण निधीतून जनरेटर का लावण्यात येत नाही? नुकत्याच जन्माला आलेल्या बालकांसाठी व्यवस्था असली पाहिजे. हजारो रुग्ण रुग्णालयात भरती होतात,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

हेही वाचा : “अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी…”, काँग्रेस नेत्याचं विधान

“सगळीकडे डेंग्यू, मलेरिया, टायफॉईडचे रुग्ण आहेत. अशा स्थितीत वीज नाही. डासांमुळे नवीन जन्माला आलेल्या बालकांचा जीव धोक्यात आला आहे. हा मोठा गुन्हा आहे. संबंधितांवर कारवाई करण्यास येईल,” असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.