अमरावती : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटर अमरावती व भारतीय महाविद्यालय मोर्शी, ता. मोर्शी जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन येत्या २६ मार्च रोजी होणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी विविध आस्थापनांचे, कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.
या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी http://www.mahaswayam.gov.in या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. Employment वर क्लिक करावे. Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साईन इन करा. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा. District मध्ये Amravati जिल्हा निवडून Fiter बटनवर क्किल करावे. नंतर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या Action बटनच्या खाली View व Apply बटन दिसेल. मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून Apply बटनवर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल. अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवावा. आपली रजिट्रेशन Slip PDF ची प्रिंट काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे.
याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक ०७२१-२५६६०६६ किंवा amravatirojgar@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. तसेच २६ मार्च २०२५ रोजी भारतीय महाविद्यालय, मोर्शी, ता. मोर्शी अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.