लोकसत्ता टीम

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अमरावती लोकसभा मतदारसंघात आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मतदानासोबतच आज मोठ्या संख्येने लग्नाचे मुहूर्त देखील आहेत. अमरावतीच्या वडरपुरा परिसरातील नवरदेव लग्नासाठी वऱ्हाड घेऊन वर्धा येथे जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचून त्याने मतदानाचा हक्क बजावला.

Delhi assembly elections 2025 news in marathi
दिल्ली’साठी आज मतदान; तिरंगी सामन्यात मतटक्क्यावर सत्तेचे गणित
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Maharashtra Corporation Election
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली!
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती

शहरातील वडरपुरा परिसरातील आकाश पवार या युवकाचे आज वर्धा इथे लग्न आहे. लग्नाआधी मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी आकाश पवार आपल्या आई-वडील तसेच वऱ्हाडासह वडरपुरा येथील महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला.

आणखी वाचा-उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता

वर्धा येथेही आज मतदानाचा दिवस आहे. नवरी देखील वर्धेत आधी मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता आमचे लग्न होणार असल्याचे आकाश पवार याने सांगितले.

ग्रामीण भागात उत्‍साहाला मतदानास सुरूवात झाली. जिल्‍ह्यात काल रात्री अवकाळी पाऊस झाला. प्रादेशिक हवामान विभागाने पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर तापमान वाढण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्‍या रांगा लागलेल्‍या दिसत आहेत. सध्‍या शेतीच्‍या मशागतीची कामे सुरू असल्‍याने शेतकरी, शेतमजूर सकाळीच मतदान केंद्रांवर पोहचून मतदानाची लगबग दिसत आहे.

Story img Loader