ब्रेडला थुंकी लावून त्याचा व्हिडीओ टिकटॉवर अपलोड करण्यात आल्याची धक्कादायक आणि तितकीच किळसवाणी घटना समोर आली आहे. अमरावतीमधील एका बेकरीत हा प्रकार घडला आहे. एकीकडे राज्यात करोनामुळे गंभीर परिस्थिती असल्याने सर्वतोपरी काळजी घेतली जात असताना या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अचलपूर पोलिसांनी कारवाई करत तरुणाला अटक केली आहे. सोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

बुधवारी सायंकाळी बेकरीत ब्रेड कापून त्याला थुंकी लावतानाचा व्हिडीओ ‘टिकटॉक’वर अपलोड करण्यात आला होता. काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर सर्वत्र टीका सुरू झाली होती. हे चित्रीकरण आपल्या बेकरीमधील असल्याचे कळताच बेकरी मालक मोहम्मद नासीर, अब्दुल सलाम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत अब्दूल नाजीम शेख महमुद (वय २९) याला अटक केली असून एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

 

Story img Loader