अमरावती : मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अमरावती ते पुणे (लातूरमार्गे) द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून या रेल्वेगाडीच्या ८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस दर शुक्रवारी आणि रविवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री २२.५० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सायंकाळी १७.३० वाजता अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. १ डिसेंबरपर्यंत या रेल्वेगाडीच्या चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस दर शनिवारी आणि सोमवारी रात्री १९.५० वाजता अमरावती रेल्वे स्थानकावरून सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी १६.२० वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. येत्या २ डिसेंबरपर्यंत या रेल्वेगाडीच्या चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा – छठ पूजा: हा बिहारचा महत्त्वाचा सण का आहे?
या रेल्वेगाड्यांना बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पुर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, जेऊर, जिंती रोड, दौंड, केडगाव, उरळी या रेल्वे स्थानकांवर थांबा राहणार आहे.