अमरावती : प्रवाशांना होळी सणानिमित्त आपल्‍या गावी जाण्यासाठी मध्य रेल्‍वेच्‍या मुंबई आणि पुणे विभागातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जाण्‍यासाठी या रेल्‍वेगाड्यांचा उपयोग होणार आहे. एकूण ७६ विशेष गाड्या वेगवेगळ्या मार्गावरून धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडी क्रमांक ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर आणि परतीची ०२१४० नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या विशेष रेल्‍वेगाड्या ९ मार्च, ११ मार्च, १६ मार्च आणि १८ मार्चला धावणार आहेत. ०१४६९ पुणे-नागपूर ११ आणि १८ मार्चला ०१४७० नागपूर-पुणे १२ आणि १९ मार्चला, ०१४६७ पुणे-नागपूर १२ आणि १९ मार्चला, ०१४६८ नागपूर-पुणे १३ आणि २० मार्चला धावणार आहे.

गाडी क्रमांक ०११५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव तसेच परतीची ०११५२ मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन विशेष गाड्या ६ आणि १३ मार्च रोजी धावणार आहेत. ०११०५ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-नांदेड आणि ०११०६ नांदेड-लोकमान्‍य टिळक टर्मिनस या विशेष गाड्या १२ मार्च आणि १९ मार्च रोजी धावणार आहेत.

०११२९ लोकमान्‍य टिळक टर्मिनस- मडगाव १३ मार्च आणि २० मार्च रोजी तर ०११३० मडगाव-लोकमान्‍य टिळक टर्मिनस १४ आणि २१ मार्च रोजी, ०१०६३ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-तिरूवअनंतपूरम ६ आणि १३ मार्चला तर ०१०६४ तिरूवअनंतपूरम- लोकमान्‍य टिळक टर्मिनस ८ आणि १५ मार्चला धावणार आहे.

०११२३ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-महू ही विशेष गाडी ७, ९, १४ आणि १६ मार्च रोजी धावणार असून परतीची ०११२४ महू-लोकमान्‍य टिळक टर्मिनस ९, ११, १६ आणि १८ मार्च रोजी धावणार आहे. ०१४९१ पुणे-हजरत निझामुद्दिन ७ आणि १४ मार्चला, ०१४९२ हजरत निझामुद्दिन ८ आणि १६ मार्चला सुटणार आहे. ०१४३१ पुणे-गाझीपूर सिटी ७, ११, १४ आणि १८ मार्चला सुटणार आहे. तर ०१४३२ गाझीपूर सिटी-पुणे ९, १३, १६ आणि २० मार्च रोजी सुटणार आहे.

०११०९ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-दानापूर १०, १५ आणि १७ मार्चला, ०१०१० दानापूर- लोकमान्‍य टिळक टर्मिनस ११, १६ आणि १८ मार्चला सुटणार आहे. ०१४८१ पुणे-दानापूर १०, १४ आणि १७ मार्चला, ०१४८२ दानापूर-पुणे १२,१६ आणि १९ मार्च रोजी सुटणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कन्‍याकुमारी, लोकमान्‍य टिळक टर्मिनसवरून समस्‍तीपूर, वाराणशीसाठी विशेष गाड्या सोडण्‍यात येणार आहेत.