अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांचा अवमान केल्याच्या विरोधात, आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर धडकले. पोलिसांशी अरेरावी, उद्धट वागणूक आणि शासकीय कामात अडथळा आणल्‍या प्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी, त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्‍याकडे केली. नवनीत राणा यांची पोलिसांसोबत नेहमीच असभ्य वागणूक असते. रागाच्‍या भरात घरातून निघून गेलेल्या युवतीच्या प्रकरणाला ‘लव्‍ह-जिहाद’चे वळण देऊन; समाजात तेढ निर्माण करणे, यासह पोलिसांचा सातत्याने अपमान करणे, हा प्रकार खासदारांना शोभत नाही. त्यांच्या विरोधात योग्य अशी कारवाई व्हावी, या मागणीसाठी आज सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने पोलीस आयुक्तालयावर धडक दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

हेही वाचा <<< नवनीत राणांचे अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “माझ्यावर जे गुन्हे…”

नवनीत राणा यांची पोलिसांसोबतची ही वागणूक योग्य नाही. त्या सातत्याने पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान करतात. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे कर्तव्य खासदार नवनीत राणा यांना ठाऊक नाही. बारा ते पंधरा तासापर्यंत कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांना नेमक्या किती वेदना सहन कराव्या लागतात, याची जाणीव खासदार नवनीत राणा यांना नाही. पोलिसांच्या प्रति त्यांचे वागणे योग्य नसून; त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. नवनीत राणा यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी पोलीस आयुक्तालयावर धडकलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त आपल्या दालनातून बाहेर आल्या. यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्वांना सभागृहात बसण्याची विनंती केली. त्यानंतर प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधून सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत आणि खासदार नवनीत राणा यांच्या बाबतचे त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati retired police aggressive against navneet rana police commissionerate politics ysh