‘राणाजी माफ करना…’ गाण्‍यावर नवनीत राणा थिरकल्‍या!

राणा समर्थकांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंदोत्‍सव साजरा केला. त्‍यांच्‍या या जल्‍लोषापासून भाजपच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी दूर राहणे पसंत केले.

amravati vidhan sabha election result 2024 navneet rana dance on song ranaji maf karna
नवनीत राणा यांनी राजकमल चौकात जल्‍लोष करताना त्‍याला प्रत्‍युत्‍तर देण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याची चर्चा रंगली. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमरावती : जिल्‍ह्यातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत होते. भाजपला यश मिळत असल्‍याचे पाहून भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण पसरले. बडनेराचे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा हे विजयाच्‍या समीप पोहचले. त्‍यावेळी रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा हे कार्यकर्त्‍यांसमवेत दुचाकीवर बसून येथील राजकमल चौकात पोहचले. कार्यकर्त्‍यांनी गुलाल उधळला. डीजे वाजू लागला.“राणाजी माफ करना…” हे गाणे ऐकवले गेले आणि नवनीत राणा मोटरसायकलवर उभ्‍या झाल्‍या. तोल सांभाळत त्यांनी केलेल्‍या नृत्‍याची चित्रफित प्रसारीत झाली आहे.

नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्‍यानंतर विरोधकांनी राजकमल चौकात जल्‍लोष केला होता. त्‍यावेळी काही लोकांनी आक्षेपार्ह वर्तन केल्‍याने त्‍यावर बरीच टीका देखील झाली होती. या निवडणुकीत शहरात प्रचारादरम्‍यान हा मुद्दा देखील चर्चेत आला होता. नवनीत राणा यांनी राजकमल चौकात जल्‍लोष करताना त्‍याला प्रत्‍युत्‍तर देण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याची चर्चा रंगली.

आणखी वाचा-Ballarpur Vidhan Sabha Seat : हा तर लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, मुनगंटीवार म्हणतात, “विजय झाला तर माजायचे…”

नवनीत राणा यांनी राजकमल चौकात जल्‍लोष करताना धनुष्‍यातून बाण मारण्‍याचे केलेले हावभाव देखील लोकांनी आपल्‍या मोबााईलमध्‍ये टिपले. यावेळी राणा समर्थकांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंदोत्‍सव साजरा केला. त्‍यांच्‍या या जल्‍लोषापासून भाजपच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी दूर राहणे पसंत केले. अमरावतीतून महायुतीच्‍या उमेदवार सुलभा खोडके या निवडून आल्‍याने त्‍यांना शुभेच्‍छा देण्‍यासाठी आमदार प्रवीण पोटे हे खोडके यांच्‍या जनसंपर्क कार्यालयावर पोहचले होते.

नवनीत राणा या नंतर परतवाडा येथे पोहचल्‍या. तिथे त्‍या भाजपचे प्रवीण तायडे यांच्‍या विजयी मिरवणुकीत सहभागी झाल्‍या. या मिरवणुकीतही त्‍यांनी अनेक गाण्यांवर पदन्‍यास केला. नवनीत राणा यांनी समाज माध्‍यमांवरील प्रोफाईलवर ‘आय नील यू’ म्‍हणजे ‘मी तुम्‍हाला शून्‍यावर आणले आहे’ असा संदेश देत विरोधकांना डिवचले आहे.

आणखी वाचा-सिंदखेडराजा, मेहकरमध्ये धक्कादायक निकाल; बुलढाण्यात जिल्ह्यात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

प्रहार जनशक्‍ती पक्षाचे बच्‍चू कडू यांनी नवनीत राणा यांच्‍या विरोधात भूमिका घेत लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी उमेदवार उभा केला होता. नवनीत राणा यांच्‍या पराभवामागे तेही एक कारण ठरले. त्‍यामुळे यावेळी बच्‍चू कडू यांना पराभूत करण्‍यासाठी राणा दाम्‍पत्‍याने व्‍यूहनीती रचली. त्‍यात त्‍यांना यश मिळाले. दुसरे विरोधक अभिजीत अडसूळ यांचा दर्यापुरातून पराभव झाला. या निवडणुकीत राणा दाम्‍पत्‍याच्‍या सुडाच्‍या राजकारणावर बरीच चर्चा झाली होती. राणा दाम्‍पत्‍याने आजच्‍या जल्‍लोषातून विरोधकांना चांगलेच डिवचल्‍याची चर्चा सुरू झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amravati vidhan sabha election result 2024 navneet rana dance on song ranaji maf karna mma 73 mrj

First published on: 23-11-2024 at 19:25 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा