स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूरच्या सेंट उर्सुला गर्ल्स शाळेच्या ७५ विद्यार्थिनींनी धावत्या मेट्रोत ७५ चित्रे रेखाटून आगळा वेगळा उपक्रम राबवला. मेट्रोमध्ये चित्र रेखाटून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची संकल्पना शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थिनींपुढे मांडली व त्याला विद्यार्थिनींनी सहमती दिली. विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास चित्रांच्या माध्यमातून रेखाटला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहिदांना विद्यार्थिनींनी चित्र आणि रंगाच्या माध्यमातून अभिवादन केले.

Story img Loader