राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यांची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत असं अमृता यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे. अमृता यांच्या या विधानासंदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच याच मुलाखतीत त्यांनी माजी मंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त टीकेसंदर्भातही स्पष्टीकरण दिलं आहे.

माझ्या काही वक्तव्यांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांपर्यंत तक्रार गेल्याचं अमृता यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं. “माझ्या काही वक्तव्यांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आल्याचं खरं आहे. मात्र तक्रार करणारे हे स्वत:च्या घरातील स्त्रियांबद्दल उदासीन आहेत,” असं अमृता म्हणाल्या.

Raj Thackeray Uddhav Thackeray (1)
Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
aditya thackeray criticized raj thackeray
“भाजपाचा मुख्यमंत्री बसावा असं स्वप्न बघणारे…”; आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!
Raj Thackeray on shivsena and ncp split
Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”
What Raj Thackeray Said About Shivsena NCP Split
Raj Thackeray : “उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे पक्ष फुटले, कारण..”, राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलं?
raj thackeray on amit thackeray (1)
अमित ठाकरेंचा निवडणूक लढवण्याचा निर्णय, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय होती? स्वत: सांगितला ‘तो’ प्रसंग!

आदित्य ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त टीकेबद्दलही आमृता यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. “आदित्य ठाकरेंनी देवेंद्रजींना स्त्री अत्याचारी तसेच प्रतिगामी असल्याचं म्हटलं तेव्हा माझा तिळपापड झाला. म्हणूनच मी त्यांना रेशमाचा किडा असं संबोधलं होतं. देवेंद्रजी परिश्रम करुन वर आले आहेत. तर ते (आदित्य ठाकरे) कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे वर आले,” असं अमृता म्हणाल्या.

नक्की वाचा >> “मला ट्रोल करणारे ट्रोलर्स म्हणजे महाविकास आघाडीने…”; अमृता फडणवीसांचं सडेतोड उत्तर; ‘या’ एकमेव व्यक्तीला घाबरत असल्याचं केलं मान्य

तसेच उद्धव ठाकरेंना भोगी म्हणण्यामागील कारणाबद्दलही आमृता यांनी आपल्या उत्तरामध्ये भाष्य केलं. “उद्धव ठाकरेंना कुटुंबातील सदस्य या नात्याने मी भोगी म्हटलं होतं. तर नेतृत्व म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकावं असं आवाहन केलं होतं,” असंही अमृता यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

नक्की वाचा >> “माझी कमाई देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त कारण त्यांनी कधी पैसे…”; नागपूरमधील जाहीर कार्यक्रमात अमृता फडणवीसांचं विधान

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता यांनी ही सर्व उत्तरे दिली. न्यायमूर्ती म्हणून अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी भूमिका बजावली. संस्थेच्या प्रथम अध्यक्ष ताराबाई शास्त्री यांच्या स्मृतिनिमित्त या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.