नागपूर : वयाने केवळ ११ वर्षांच्या असलेल्या बालिकेचे आरोपी अझहर आणि तहा अरमान हे दोघेही लैंगिक शोषण करीत होते. त्यांची विकृती एवढी वाढली की त्यांनी मुलीला शरीरवाढीसाठी ‘हार्मोन्स’चे इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या. त्यामुळे तिच्या शरीराच्या काही अवयवांची कृत्रिम वाढ झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिना शेख (२६) ही बंगळुरूतील श्रीमंत कुटुंबातील तरुणी असून तिचे नागपुरातील रिअल इस्टेट ब्रोकर तहा अरमान इशताक अहमद खान (वय ३९) याच्याशी लग्न झाले होते. ती पतीसह बेसा-पिपळा रोडवरील अथर्वनगरी-३ मधील सदनिकेत राहत होती. तिने आपला भाऊ अझहर शेख यालाही बोलावून घेतले. तिघेही मिळून बालिकेवर अत्याचार करीत होते. लैंगिक विकृती जडलेला अझहर मुलीचे शारीरिक शोषण करीत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अझहर हा वकिलाच्या संपर्कात होता. त्याला प्रभारी ठाणेदार विक्रांत सगणे यांच्या पथकाने न्यायालयासमोर सापळा रचून अटक केली.

हेही वाचा – अमरावती : चारित्र्यावर संशय घेऊन मुलानेच केली आईची हत्‍या; लहान भावालाही संपविले

हेही वाचा – उपराजधानीत नागनदीवरील पुलांची स्थिती धोकादायक, दुर्घटना घडल्यावर महापालिकेला जाग येणार का?

विकृतीमुळे पत्नी पळाली

अझहर नुरुद्दीन शेख (३५, बंगळुरू) याला सापळा रचून नागपुरातून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हिनाचा भाऊ अझहर याचे पहिले लग्न झाले आहे. तो विकृत असल्यामुळे त्याची पत्नी पळून गेली. यापूर्वी, तहा अरमानला पोलिसांनी अटक केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An 11 year old girl was raped in nagpur injections of hormones given for body growth adk 83 ssb
Show comments