महाराष्ट्राची भाग्यरेषा तर सोडाच पण मृत्यूचा सापळा ठरलेल्या समृद्धी महामार्गावर वन्यप्राण्यांचा धोकादायक वावर आणि कागदोपत्री असलेली ‘हेल्पलाईन’ याचा विदारक अनुभव साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) येथील अंकुर देशपांडे याना आला.त्यांच्या चारचाकी वाहनासमोर अचानक एक रोही आला. वाहनाच्या धडकेत रोहीचा मृत्यू झाला. यात देशपांडे कुटुंबीय सुदैवाने बचावले. त्यातही ‘हेल्पलाईन’चा प्रतिसाद न मिळाल्याने ते कार्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या घरी पोहोचले.
हेही वाचा >>>नागपूर : घरावर भाजपचा फलक लावा, फडणवीस यांची बुथ प्रमुखांना सूचना
भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अंकुर देशपांडे हे मंगळवारी रात्री उशिरा औरंगाबादवरून साखरखेर्डा येथे येत त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होते. दरम्यान, एक रोही त्यांच्या वाहनासमोर आला. वाहनाची रोहीला जबर धडक बसली, यात त्याचा मृत्यू झाला. सुदैवाने, देशपांडे यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुले, चालक बचावले.
हेही वाचा >>>गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रोखला बालविवाह
या मानसिक धक्क्यातून कसेबसे सावरल्यावर देशपांडे यांनी ‘हेल्पलाईन’वर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. वाहन क्षतीग्रस्त, रात्रीची वेळ, सोबत कुटुंबीय, अशा स्थितीत देशपांडे यांनी दुसरबिड, सिंदखेडराजा येथे संपर्क केला असता पक्षाचे कार्यकर्ते मदतीला धावून आले. त्यांनी देशपांडे कुटुंबीयांना साखर खेर्डा येथे घरी पोहचवले.