नागपूर : एका ६० वर्षीय सुरक्षारक्षकाने १५ वर्षीय मुलीला घरी नेऊन लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. अश्लील चाळे करीत असतानाच मुलीने प्रतिकार करीत घरी पळ काढला. घरी पोहोचत आईला घटनेची माहिती दिली. ही संतापजनक घटना पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. पोलिसांनी प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेता तत्काळ आरोपीला अटक केली. राजू विठोबा अंबादे (६०) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी आठव्या वर्गात शिकते. राजू तिला आधीपासूनच ओळखत होता. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मुलगी घराजवळ आयोजित एका कार्यक्रमाला गेली होती. राजूने तिला रस्त्यात अडवले. कामाच्या बहाण्याने तिला घरी घेऊन गेला. तो घरी एकटाच होता. त्याने बालिकेशी अश्लील चाळे करून बळजबरी करण्यास सुरुवात केली. मुलीने त्याला कसून विरोध केला. जोरात धक्का देऊन दूर लोटले आणि घरी पळ काढला. घरी पोहोचताच तिने आईला याबाबत सांगितले. आईने तिच्यासह पाचपावली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

हेही वाचा – नागपूर : मुलीने ‘रिल्स’ बघताच वडिलांचे प्रेमप्रकरण उघडकीस

हेही वाचा – बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम, ‘हॅमुन’ नावाने ओळखले जाते हे चक्रीवादळ

पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून राजूला अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.

Story img Loader