प्रियकारासोबत मांडलेला डाव मोडून पुन्हा पतीकडे राहायला गेलेल्या प्रेयसीवर मिनी ट्रक चढवून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना नागपूरमधील बुटीबोरीत घडला. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रमोद महादेव पाटील (५८, सातगाव. ता. हिंगणा) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

हेही वाचा- राज्यात सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात ; पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्हा पहिल्या स्थानावर

पत्नीचे प्रियकरासोबत अनैतिक संबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३४ वर्षीय महिला किरण (काल्पनिक नाव) ही बुटीबोरीत राहते. ती विवाहित असून तिला एक मुलगा आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिची आणि आरोपी प्रमोद पाटील या दोघांची ओळख झाली. ओळखीतून त्यांची मैत्री झाली. प्रमोद याचा जीव विवाहित असलेल्या किरणवर जडला. दोघांचे काही दिवस प्रेमसंबंध होते. पती आणि मुलगा घरी नसताना प्रमोद घरी येत होता. दोघेही शारीरिक संबंध ठेवत होते. एके दिवशी दोघांनाही घरात पतीने रंगेहात पकडले. त्यामुळे दोघांनीही मार्ग मोकळा करीत पळ काढला.

हेही वाचा- लोकजागर : उद्योगांवर गुन्हेगारीचा ‘घाव’!

पतीकडे परतलेल्या प्रेयसीला गाडीने चिरडण्याचा प्रयत्न

दोघेही सोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागले. मात्र, तिला पुन्हा पतीची आठवण येत होती. परंतु, प्रियकर तिला सोडायला तयार नव्हता. तिने प्रमोदच्या नकळत पतीला फोन करून घरी परत घेण्याबाबत विचारणा केली. पतीने मोठ्या मनाने माफ करीत घरात घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ती महिन्याभरापूर्वी पतीच्या घरी परतली. तेव्हापासून प्रमोद पाटील चिडला होती. तो किरणला वारंवार फोन करून पुन्हा पळून जाण्याचा तगादा लावत होता. परंतु, ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. चिडलेेल्या प्रमोदने मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता कामाला जाणाऱ्या किरणच्या अंगावर मिनी ट्रक चढवून खून करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या किरणवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून बुटीबोरी पोलिसांनी आरोपी प्रियकर प्रमोद पाटीलला अटक केली.

Story img Loader