नागपूर: आर्थिक व्यवहारावरून उद्भवलेल्या वादात तिघांनी मैत्रिणीच्या घरात लपून बसलेल्या एका युवकावर प्राणघातक हल्ला केला. मध्यस्थीसाठी गेलेल्या मैत्रिणीलाही जखमी केले. ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. रजत पाटील (२४) रा. कपिलनगर आणि सोनाली उईके (२२) रा. इंदोरा अशी जखमींची नावे आहेत.

या प्रकरणी रजतची आई माला पाटील (५०) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला. उद्देश डोंगरे (२४) रा. इंदोरा, सागर गजभिये आणि विक्की उर्फ मंगल इंदूरकर दोन्ही रा. मॉडेल टाउन अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
Pune Crime News
Pune Crime : “कात्री खुपसून पत्नीची हत्या करत पतीने व्हिडीओ शूट केला, आणि…”; पोलिसांनी सांगितला खराडीतील घटनेचा तपशील
Crime Branch succeeds in arresting two accused in Kanjurmarg murder case Mumbai print news
कांजुरमार्ग येथली हत्येप्रकरणी दोघांना अटक; कांजूर मेट्रो कारशेड परिसरात सापडला होता मृतदेह
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत

हेही वाचा… सुमीत ठाकूरच्या टोळीच्या सदस्याला मुंबईतून अटक

रजतची आरोपींची चांगली मैत्री होती. काही दिवसांपूर्वी उद्देशला एका कामाचे ७ हजार रुपये मिळाले. मात्र, त्याच्याकडे ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था नसल्याने त्याने रजतला त्याच्या खात्यात पैसे मागवायला सांगितले. परंतु रजतकडे सुध्दा यूपीआय पेमेंट सुविधा नव्हती. त्याने मैत्रिण सोनालीच्या नंबरवर पैसे जमा केले. उद्देश जमा केलेले पैसे वारंवार मागत होता. परंतू रजत त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. यावरून त्यांच्यात वाद झाला.

रजत रविवारी दुपारच्या सुमारास सोनालीच्या घरी गेला. उद्देश व त्याच्या मित्रांना याची माहिती मिळाली. तिघेही मित्र सोनालीच्या घरी गेले. रजतला बोलावून पैशाची मागणी केली. परंतु, रजत टाळाटाळ करीत असल्याने तिघांनीही रजतला मारहाण केली. उद्देश ने चाकू काढून त्याच्यावर हल्ला केला. मध्यस्थीसाठी गेलेली सोनालीसुध्दा जखमी झाली. आरोपींनी तिलाही मारहाण केली आणि पळून गेले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रजतला मेयो रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदवत अटक केली.

Story img Loader