वर्धा : येथील सुप्रसिद्ध समाजसेवी व पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे पदाधिकारी आशीष गोस्वामी यांनी विहिरीत उडी घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली. त्यामागचे कारण अवैध वृक्षतोड हे होते. सेवाग्रामकडून दत्तपूरला जाणाऱ्या मार्गालगत मोठे वृक्ष आहेत. यापैकी एका झाडाची फांदी तोडल्याचे निदर्शनास आले. गोस्वामी यांनी ही बाब जिल्हाधिकारी व अन्य कार्यालयाच्या निदर्शनास आणली होती. मात्र काहीच कारवाई झाली नाही. आज एक मोठे झाड तोडल्याचे त्यांनी पाहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या विरोधात त्यांनी फेसबुक लाईव्ह करीत एका तासात कारवाई करावी, अशी मागणी केली. पण काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या गोस्वामी यांनी लगतच असलेल्या विहिरीत उडी घेतली. मात्र, हे माहीत होताच अधिकारी धावून आले. त्यांनी झाड तोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. या जलसमाधी आंदोलनाने शेवटी प्रशासन जागे झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.