वाशिम : सध्या ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक संकेतस्थळावरून लोक आवडीने खरेदी करतात. मात्र, वाशिम शहरातील एका व्यक्तीने हेडफोनची ऑनलाईन ऑर्डर केली असता त्याला चक्क दगड मिळाल्याची घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ओबीसीप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या – रामदास आठवले

हेही वाचा – नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीबाबत जनहीत याचिका, उच्च न्यायालयात १८ ऑक्टोबरला सुनावणी

वाशिम शहरातील पप्पू घुगे यांनी एका ऑनलाईन संकेतस्थळावरून मोबाईलकरिता हेडफोनची ऑर्डर केली होती. त्यानंतर पुन्हा दोन ऑर्डर केल्या. त्यापैकी प्रथम केलेल्या ऑर्डरमध्ये प्रत्यक्ष घरी वस्तू आल्यानंतर ते उघडून पाहिले तर त्यामध्ये चक्क दगडाचा छोटा तुकडा बघून धक्काच बसला. याबाबत त्यांनी तत्काळ खरेदी केलेल्या ठिकाणी फोन करून रीतसर तक्रार दाखल केली. मागील काही दिवसांपासून ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे तुम्हीदेखील ऑनलाईन खरेदी करीत असाल तर खात्री करूनच करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An incident occurred when a person in washim city received a stone while ordering headphones online pbk 85 ssb
Show comments