बुलढाणा : शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्याचा लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे मृत्यू झाल्याची घटना पिंप्राळा (ता. खामगाव) येथे घडली. श्रीधर दयाराम पटोकार( ४१, राहणार पिंप्राळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

गुरुवारी (दि. १५) रात्री पावणेदहाच्या सुमारास ते ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरने शेतीची मशागत करीत होते. शेतात लोंबकळलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारांचा ट्रॅक्टरला स्पर्श झाला. यामुळे विद्युत धक्का लागून पटोकार यांचा करुण अंत झाला. ही माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा – बुलढाणा तालुका शिवसेनेची आज बैठक, विविध विषयांवर वादळी चर्चेची शक्यता

शेतकऱ्याच्या मृत्यूस महावितरणचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Story img Loader