बुलढाणा : कांद्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना रडविले आहे. अशातच कांद्यामुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा बळी गेल्याचे खळबळजनक वृत्त आहे.
हेही वाचा – नागपूर : आमदार कृष्णा खोपडेंनाही मंत्रिपदाचे आमिष; नड्डांच्या नावाने थेट दिल्लीतून फोन
चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने पेरा केलेला कांदा अतिवृष्टीमुळे सडला. डोक्यावर मोठे कर्ज आणि आर्थिक अडचणींचा डोंगर लक्षात घेऊन चिंताग्रस्त शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविली. महेंद्र लक्ष्मण जामोदे असे या दुर्देवी शेतकऱ्याचे नाव आहे. ते खामगाव तालुक्यातील गारडगाव येथील रहिवासी होते. पोलिसांनी प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.