बुलढाणा: सवणा चिखली मार्गावर एसटी बस १० फूट खोल दरीत कोसळली. यामुळे विद्यार्थ्यांसह सुमारे २५ प्रवासी जखमी झाले. यातील ६ जणांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हेही वाचा – यवतमाळ : खून, प्राणघातक हल्ल्यात वाढतोय अल्पवयीन मुलांचा सहभाग…
हेही वाचा – गडचिरोली : ४० आदिवासी विद्यार्थी खाणक्षेत्राशी संबंधित शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार
सवणा येथून चिखलीकडे येणारी (एमएच २० डी ९३६७) एसटी बस विरुद्ध दिशेने १० फुट खोल दरीत कोसळली. बसमध्ये प्रामुख्याने शाळकरी मुलांचा भरणा होता. प्राप्त माहितीनुसार, मुले व मुली शिकवणी वर्गासाठी चिखलीला जात होते. सवणा येथून बस चिखलीकडे जात असताना ‘स्टेअरिंग फ्रि’ झाले व ब्रेक न लागल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि बस दरीत घसरत गेली.