लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती: वरुड तालुक्यातील एकलविहीर गावातील एका विहिरीत एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाला शीर आणि हात नाही. तसेच पोत्यात केवळ शरीराचा सांगाडाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे हत्येनंतर शीर आणि हात कापून मृतदेह विहिरीत टाकल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस पोहोचले आहेत. त्यामुळे वरुड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
एकलविहीर गावातील एका शेतातील विहिरीच्या पाण्याची दुर्गंधी आली. ही बाब शेतमालकाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी विहिरीच्या पाण्याचा उपसा सुरू केला. विहिरीचे संपूर्ण पाणी उपसल्यानंतर बुडात दोन पोते दिसले. त्यामधून दुर्गंधी येत होती. म्हणून पोते बाहेर काढले. त्यावेळी एका पोत्यात मानवी मृतदेह (सांगडासदृश) तर दुसऱ्या पोत्यात दगड होते. दोन्ही पोते एकमेकांना बांधले होते. यावरुन आरोपींनी हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगायला नको, म्हणून दगड बांधल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा… भंडारा : उधारीच्या पैशाचे कारण, तरुणाचे केले अपहरण
मृतदेहावर मास शिल्लक नाही, शीर नाही, हात नाही त्यामुळे ओळख पटवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले आहे. मात्र अंगात निळ्या रंगाची जीन पॅन्ट असून, तो तरुणाचा मृतदेह असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्या आधारे वरुड पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्या करणे तसेच पुरावा नष्ट करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा… नागपूर: अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर चहाटपरी चालकाचा बलात्कार
प्रथमदर्शनी हे कृत्य एक महिन्यापूर्वीचे असावे, असा अंदाज आहे. हा पूर्वनियोजीत कट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.