अंगणवाडी सेविकेच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीतही कठीण समजल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेत ५६९ गुण मिळवले. सुमित इंगळे (रा. बीबी, ता. लोणार) असे या प्रातिभावान विद्यार्थ्याचे नाव आहे. सुमितची आई उच्चशिक्षित (एम.कॉम.) असली तरी जेमतेम परिस्थितीमुळे त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत आहेत. त्याचे वडील मधुकर इंगळे दुसरबीड (ता. सिंदखेडराजा) येथे पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत.
हेही वाचा : नागपूर : विदर्भात पूरस्थिती, मानो-यात ढगफुटी, भामरागडचा संपर्क तुटला
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे दोन मुलांना उच्च शिक्षण देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. सुमित प्रतिभावान असला तरी मोठ्या शहरात शिकायला किंवा शिकवणीसाठी जाणे अशक्य होते. त्याने देऊळगाव राजा येथे राहून नीट परीक्षेचा अभ्यास केला. यातून ‘नीट’च्या निकालात ७२० पैकी ५६९ गुण त्याने मिळवले. आता डॉक्टर होण्याचे त्याचे ध्येय आणि पालकांचे स्वप्न तो साकारणार आहे.