वर्धा : आयटकप्रणित अंगणवाडी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत उतरले आहे. २८ मार्चला संघटना प्रतिनिधींची बैठक केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या संसद भवनातील कक्षात झाली होती. त्यावेळी राज्य शासनाने विविध मागण्यांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात असल्याचे नमूद केले होते. पण प्रत्यक्षात असे प्रस्ताव केंद्राकडे दिलेच नसल्याचे आता दिसून आले आहे. असे का झाले, अशी विचारणा दिलीप उटाणे व माधुरी क्षीरसागर करतात. जीवन ज्योती, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, जनश्री विमा व केंद्राशी संबंधित अन्य योजनांचे लाभ प्रलंबित आहेत.
लघु अंगणवाडी केंद्राचे मोठ्या अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्याचा प्रस्ताव त्वरित केंद्राकडे पाठविण्याचा संघटनेचा आग्रह आहे.तसेच करोना काळातील सुट्ट्या,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे एकरकमी लाभ,राज्यातील अनेक जिल्ह्यातल्या काही वर्षांपासून थकीत प्रवास भत्ता,चांगल्या दर्जाचे मोबाईल व अन्य मागण्या रखडल्या आहेत. मुंबईत रायगड भवनात आयुक्तांनी पंधरा दिवसात मागण्या मान्य करण्याची हमी दिली होती.ती अमलात न आल्यास जून महिन्यापासून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटना नेत्या तारा बनसोड,नयन गायकवाड,ज्योती शहारे,मधू कदम, सुनील खंडागळे यांनी दिला.