चंद्रपूर येथील शासकीय कार्यक्रम आटोपून देवाडा खुर्दला येत असताना सातारा तुकूम घटमाऊली जंगल परिसरातील मुख्य मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अंगणवाडी सेविकेला डुकराने दिलेल्या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शीला रवींद्र बुरांडे, रा.देवाडा खुर्द (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – अमरावती : नात्याला काळीमा! चुलत भावाकडून बहिणीचे लैंगिक शोषण

हेही वाचा – चंद्रपूर : ‘आम्हाला दुसरे शिक्षक द्या हो…’, विद्यार्थ्यांचे भर उन्हात रास्ता रोको आंदोलन

मृतक शिला रविंद्र बुरांडे या पोंभूर्णा पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या देवाडा खुर्द‌‌‌ येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. चंद्रपूर येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषद चंद्रपूरअंतर्गत जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरू असून, यात अंगणवाडी सेविकेच्या संघाकडून त्या खोखो स्पर्धेत भाग घेण्यासाठी चंद्रपूरला गेल्या होत्या. खोखोची स्पर्धा आटोपल्यानंतर त्या देवाडा खुर्द‌‌‌ला पतीसोबत दुचाकीने परत येत असताना गिलबिली सातारा तुकूम मार्गावरील जंगल परिसरातील घट माऊली मंदिराजवळ त्या रस्त्याच्या कडेला उतरल्या. यावेळी बाजुलाच झुडुपात असलेल्या रानडुकराने शीला यांना मागाहून जोरदार धडक दिली. यामुळे त्या रोडवर पडल्या. डोक्यावर जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.