देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत पालांदूर/जमी. येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ येथे शालेय पोषण आहाराची अफरातफर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंगणवाडीच्या शेजारील वाडीत शालेय पोषण आहारातील मिरची पावडरची सुमारे आठ ते दहा किलो वजनाची पाकिटे आढळून आली आहेत. अंगणवाडी सेविकेने हे साहित्य वाडीत लपवले असावे, असा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. या अंगणवाडी केंद्रात शोभा लांजेवार या सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्या शासनाकडून आहार मिळत असतानाही विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात देत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा >>> कंत्राटी पदभरतीला उच्च न्यायालयात आव्हान, निर्णय होईपयर्यंत…

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

१४ आक्टोबर रोजी अंगणवाडीच्या शेजारी असलेल्या वाडीत मिरची पावडरची पाकिटे आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी लांजेवार यांना विचारपूस केली. यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. याबाबत सरपंच आणि उपसरपंचांसह ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत अंगणवाडी सेविकेला जाब विचारला. मात्र, लांजेवार यांनी त्यांनाही योग्य उत्तरे दिली नाही. अखेर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हे साहित्य जप्त केले.  दरम्यान, जिल्हा प्रशासनाने अंगणवाडी सेविका शोभा लांजेवार यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पुढील दोन दिवसांत निर्णय न झाल्यास अंगणवाडीला कुलूप ठोकण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.