संपूर्ण राज्यात अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा गेल्या आठ दिवसांपासून संप सुरू आहे. शासन आणि संपकऱ्यात कुठलीही तडजोडीची चिन्हे दिसत नसल्याने पोषण आहाराअभावी जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे, मानधनात वाढ करावी, नियमित पेन्शन, नवीन मोबाइल संच व पोषण आहार ट्रॅकर मराठीत करा, अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे.

हेही वाचा- अमित शाह, मुनगंटीवार, दानवेंवरील टीकेवरून भाजपाचा पलटवार; “चंद्रकांत खैरे वैफल्यग्रस्त, ही तर…”

गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ५६८ सेविका व १३७१ मदतनीस या संपात सहभागी झाल्या असून संपामुळे अंगणवाड्या बंद पडल्या आहेत. अंगणवाडी केंद्रातून ० ते ५ वयोगटातील बालकांना पोषण आहार तसेच स्तनदा व गरोदर मातांना पोषण आहार, संदर्भ सेवा व अंगणवाडीत येणाऱ्या बालकांना शालेयपूर्व शिक्षण दिले जाते. मात्र, आंदोलनामुळे ही सगळी कामे ठप्प पडली आहेत.

हेही वाचा- चंद्रपूर : भाजपाच्या कार्यक्रमातून माजी आमदार व माजी सभापतींची चप्पल चोरीला जाते तेव्हा…

गोंदिया जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील अंदाजे ९९ हजार ८१५ लाभार्थ्यांपैकी सुमारे २८१ बालके सॅम गटातील (तीव्र कुपोषित) व १६१ मॅम गटातील (मध्यम कुपोषित) असून मागील ८ दिवसांपासून संप सुरू असल्याने गरोदर व स्तनदा मातांना आधीच घरपोच पोषण आहार देण्यात आला. परंतु अंगणवाडी केंद्र बंद असल्याने याचा विपरीत परिणाम माता व या २८१ बालके सॅम गटातील (तीव्र कुपोषित ) व १६१ मॅम गटातील (मध्यम कुपोषित) बालकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने आंदोलकांची प्रश्ने मार्गी लावून संप मिटवावा, अशी अपेक्षा पीडित करीत आहेत.

Story img Loader