लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : पावसाचे पाणी घरात शिरल्याने संतापलेल्या नागरिकांनी चक्क एका माजी नगरसेवकालाच चोप दिला. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. नागपूरमध्ये सोमवारी जोरदार पाऊस झाला. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. रस्ते पाण्याखाली बुडाले. नागपूरमध्ये हे चित्र नेहमीचेचआहे. महापालिका काहीच करित नसल्याने लोकांचा संताप वाढला आहे.

accused injured the police who came to arrest him
कमरेला पिस्तूल खोचले, पोलीस येताच जोरात ओरडला आणि…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
private bus collided with a truck on Samriddhi Highway Driver and carrier are serious
‘समृद्धी’वरील अपघात थांबता थांबेना! खासगी बसची ट्रकला धडक; चालक,वाहक गंभीर
Araria Bridge collapses
Bihar Bridge Collapse : १२ कोटींचा पूल बांधला, उद्घाटनाआधीच कोसळला; व्हिडीओ व्हायरल
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”

सोमवारी झाल्या पावसाचे पाणी हुडकेश्वर भागातील अनेक घरांमध्ये शिरले. या भागात सिमेट रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ते उंच आणि घरे खोलगट यामुळे हा प्रकार घडला. या भागाचे माजी नगरसेवक दीपक चौधरी असून ते भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात. घरामध्ये पाणी शिरण्यासाठी महापालिकाच जबाबदार आहे, असे माणून या भागातील संतप्त नागरिकानी चौधरी यांना जाब विचारला. त्यावरून वाद होऊन काही संतप्त नागरिकांनी चौधरी यांना मारहाण केली. यात चौधरी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-‘समृद्धी’वरील अपघात थांबता थांबेना! खासगी बसची ट्रकला धडक; चालक,वाहक गंभीर

संपूर्णनागपूर शहरात ठिकठिकाणी रस्त्यांचे कामे सुरू असून त्यासाठी जुने रस्ते खोदण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने ही कामे पूर्ण क रण्याची गरज होती. मात्र पावसाळा सुरू झाला तरी अनेक ठिकाणी ही कामे अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्ते नको असे म्हणण्याची वेळ नागपूरकरांवरआली आहे. अनेक वस्त्यानी याला विरोध केला आहे. सध्या महापालिकेवर प्रशासकाची राजवट असली तरी त्यापूर्वी सलग १५ वर्ष भारतीय जनता पक्षाचीच सत्ता होती. त्यामुळे नागरिकांचा रोष या पक्षावर आहे. आताही माजी नगरसेवक विविध वस्त्यांना भेटी देत फिरत असतात. लोक त्यांना त्यांच्या समस्या सांगतात. मात्र आता नगरसेवक नाही म्हणून ते हात वरती करतात. याचा संताप नागरिकांच्या मनात आहे. त्याचा उद्रेक आता होऊ लागला आहे.

आणखी वाचा-नागपूर विमानतळ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

यापूर्वी म्हणजे सप्टेबर २०२३ मध्ये नागपूरला महापूर आला होता. अंबाझरी परिसरातील वस्त्या पाण्याखाली बुडाल्या होत्या. त्या भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेलेहोते. त्यावेळीही त्यांना संतप्त नागरिकांचा रोष सहन करावा लागला होता. महापालिका नागरी सुविधांबाबत काहीच करीत नसल्याने आता नागपूरकर आक्रमक होऊ लागले आहे. मोठे उड्डाण पुल बांधल्याने विकास होत नाही तर लोकांच्या मुलभूत गरजापूर्ण झाल्या पाहिजे असे या भागातील नागरिकांचे म्हणने आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूरमधून नितीन गडकरी विजयी झाले असले तरी त्यांच्या मताधिक्यात कमालीची घट झाली आहे. त्यासाठी रस्त्यांची अपूर्ण कामे व त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय हे प्रमुख कारण मानले जाते.