नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या एका कैद्याने हृदयाचा आजार असल्याची तक्रार कारागृह प्रशासनाकडे केली. एंजिओप्लास्टी झाली असल्याने त्याला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून अर्ज केला. कारागृह प्रशासनाने कैद्याच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. कैद्यांना वैद्यकीय सुविधा पुरविणे ही राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाला वेगळी नोटिस देण्याची गरज नाही. कारागृह प्रशासनाने त्यांच्या जबाबदारीचे पालन करत कैद्याला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना न्यायालयाने याचिका निकाली काढताना दिली.

हेही वाचा : नागपूर : मेट्रो प्रशासनाला विद्रुपीकरणाचा धाक, दिला कारवाईचा इशारा

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
open prison in india
खुले कारागृह म्हणजे काय? त्यात कैदी कसे राहतात आणि काय करतात?
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्या. एम.चांदवाणी यांनी या सूचना केल्या. हत्येच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा प्राप्त झाल्याने कैदी मार्च महिन्यापासून नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. जुलै महिन्यात त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड. एस. व्ही.कुलकर्णी आणि ॲड.एस.चांदे यांनी बाजू मांडली. राज्य शासनाच्यावतीने ॲड. अनुप बदर यांनी युक्तिवाद केला.

Story img Loader