नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या एका कैद्याने हृदयाचा आजार असल्याची तक्रार कारागृह प्रशासनाकडे केली. एंजिओप्लास्टी झाली असल्याने त्याला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून अर्ज केला. कारागृह प्रशासनाने कैद्याच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. कैद्यांना वैद्यकीय सुविधा पुरविणे ही राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाला वेगळी नोटिस देण्याची गरज नाही. कारागृह प्रशासनाने त्यांच्या जबाबदारीचे पालन करत कैद्याला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना न्यायालयाने याचिका निकाली काढताना दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in