गोंदिया: गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आज, सोमवारी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील शेकडो शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही थकले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. तीन महिन्यांपासून वारंवार जिल्हा पणन कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी तसेच जन प्रतिनिधी कडे चक्करा मारत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.
हेही वाचा… शेगावात पन्नास हजारांवर भाविक! साप्ताहिक सुट्या व एकादशीचा योग; भाविकांमुळे विदर्भ पंढरी फुलली
मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपये थक्कीत चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर ठिय्या आंदोनाला सुरू केलेला आहे. जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा… ‘जनसंवाद यात्रे’चे अधिकृत पोस्टर रिलिज, पदाधिकाऱ्यांना लावता येणार स्वत:चा फोटो
मात्र शेतकरी आमदारांची कुठलीही गोष्ट ऐकायच्या मानसिकतेत दिसत नाहीत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमदारांच्या कार्यालया बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रसंगी आपल्या घरा समोर आ. विनोद अग्रवाल, बाजार समिती संचालक पप्पू पटले आदि उपस्थित आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी ताजने, शहर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. मोठ्या संख्येने पोलीस ताफा घटनास्थळी लावण्यात आला आहे.