पारशिवनीतील गोंडेगाव कोळसा खाण लगत वराडा मौजा एसंबा येथे पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खासगी कोल वॉशरी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वारंवार सूचना दिल्यावरही काहीच होत नाही, असा आरोप करीत जय जवान जय किसान संघटनेच्या नेतृत्वात गावातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी ही वॉशरीज बंद पाडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महानिर्मितीला धुतलेला कोळसा पुरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाद्वारे एका खासगी कंपनीला कोल वॉशरीजचे काम देण्यात आले. या कंपनीची एक वॉशरीज एसंबा गावात आहे. या वॉशरीजकडून पर्यावरणबाबतच्या सूचनांची पायमल्ली होत असल्याने परिसरातील ६०० हेक्टर शेतजमीन प्रदूषित झाली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वाॅशरीज बंद पाडली. यावेळी मजुरांना बाहेर काढल्यावर शेतकरी व मजुरांमध्ये धक्काबुक्की झाली. दरम्यान येथे आमदार सुनील केदार पोहचले. त्यांनी प्रदूषण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला.