वारंवार गाजावाजा  करीत असलेल्या पंतप्रधान शेतकरी सम्मान योजनेचा लाभ तब्बल एक वर्षापासून मिळाला नाही! अर्ज केले, विनवण्या केल्या, मात्र ना सन्मान ना हफ्ता मिळाला. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी खडकपूर्णा धरणात आज अर्धनग्न ठिय्या आंदोलन सुरू केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामुळे जिल्हा प्रशासनासह संबधित यंत्रणा हादरली असून त्यांनी  घटनास्थळी दाखल होण्याची धावपळ सुरू केली. तहसीलदार धरण क्षेत्रात दाखल झाले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. शेतकऱ्यांना वर्षात ६ हजार रुपये २ हजार रुपये हाफत्याने देण्यात येतात. मात्र  देऊळगाव राजा तालुक्यात योजनेचा बट्टयाबोळ झाला आहे. एक वर्षांपासून येथील  २९५  कास्तकारांना लाभ मिळाला नाही. त्यांनी तहसीलदार, उप विभागीय अधिकारी यांना निवेदने दिलीत. मात्र न्याय मिळाला नाही.

हेही वाचा >>> ‘एमपीएससी’तर्फे ७ हजार पदांची जम्बो भरती, एक लाखांपर्यंत मिळवा पगार

आज१७ ऑक्टोबरला  बायगाव खुर्द येथील शेतकऱ्यांनी खडकपूर्णा धरणात आंदोलन सुरू केले आहे. ६००० रुपये याप्रमाणे २९५ शेतकऱ्यांचे १७ लाख ७० हजार रुपये प्रशासनाने शेतकऱ्यांना देणे आहे. त्यांना  वर्षभरापूर्वीपर्यंत सन्मान निधीचा हप्ता मिळत होता मात्र एकाएकी या शेतकऱ्यांना मिळणारा सन्मान बंद करण्यात आला होता. शेतकरी संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी संघटनेचे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष तेजराव मुंढे, शिवाजी काकड, कोंडू पाटील दहातोंडे, गुलाब जाधव, जगन मांटे यांच्यासह अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी आहेत. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, बाजार समिती सभापती समाधान शिंगणे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सध्या देऊळगाव राजा तहसीलदार  आंदोलन कर्त्यांशी चर्चा करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angry farmers started half naked protest in khadakpurna dam for not getting benefits pm kisan samman scheme scm 61 zws
Show comments