वर्धा : बाहेरगावी शिकण्यासाठी वार्षिक साठ हजार रुपये देणारी ज्ञानज्योती स्वाधार योजना इतरांप्रमाणे ओबीसी घटकास का नाही, असा सवाल महात्मा फुले समता परिषदेने केला आहे. विधिमंडळात या योजनेस मंजुरी देत एकवीस हजार विद्यार्थ्यांना लाभ देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ डिसेंबर २०२३ रोजी सभागृहात केली. त्याचे स्मरण देत संघटनेने आता आंदोलन करण्याचा इशारा दिला.

हेही वाचा – नागपूर रेल्वे स्थानकात वाद; प्रवाशाच्या नातेवाईकाने बॅटरी कारचालकावर थेट उगारली तलवार, कारण काय..

दिलेल्या शब्दास शासनाने जागावे म्हणून दोन जूनपासून नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनातून आग्रह धरल्या जाणार आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन होत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण राहणार असून समता परिषदेचे नागपूर संघटक मनोज गणोरकर तसेच विद्या बाहेकर, आरिफ काझी, निशा मुंडे, नीलकंठ पिसे तसेच सर्व पदाधिकारी व विद्यार्थी संघटना सहभागी होत आहे.

Story img Loader