वर्धा : राज्य शासनाने शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याची अखेर नोंद घेतली. या रिक्त जागा कशा भरणार, याचे उत्तरही दिले. निवृत्त झालेल्या शिक्षकांना मासिक वीस हजार रुपये मानधन देत अध्यापनाचा गाडा चालणार. पवित्र पोर्टल माध्यमातून नियमित भरती सुरू होईपर्यंत अशा नेमणुका प्राथमिक शाळांसाठी होणार. ही बाब पात्र, मात्र बेरोजगार संभाव्य शिक्षकांचा रोष ओढविणारी ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्याचा नमुना म्हणजे महाराष्ट्र जागृत जनमंच या संघटनेचे शिवराम पाटील यांचे व्हायरल होत असलेले पत्र. यातून टीकेची झोड उठवित ते म्हणतात की, निवृत्तांना चाळीस हजार रुपये पेन्शन असते. आता पुन्हा वीस हजार घेणार. हाच वीस हजार रुपये पगार बेरोजगार तरुणांना दिला तर एक कुटुंब पोसले जावू शकते. शिक्षक आमदार यावेळी काय करतात असा प्रश्न करीत त्यांनी कडक शब्दात त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

हेही वाचा – भंडारा: हुंड्यासाठी सासरच्यांकडून नववधूवर अत्याचार; नवविवाहितेच्या आईची पोलिसांत तक्रार

पोरांनी या आमदारांना खडे बोल सुनावले पाहिजे. पदवीधर गटातील आमदारांवरही पाटील चांगलेच घसरले आहे. शेवटी ते म्हणतात की, तरुण पोरगा कुंवारा आणि बापाचे लग्न दुबारा, हे कसे चालणार.