नागपूर : अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार डोळा मारतात, मात्र ठाकरे यांचा एवढा अपमान होत असताना शिवसैनिकांना काहीच वाटले नाही. मीसुद्धा शिवसैनिक होतो. पण असा अपमान बाळासाहेब असताना कधी झाला नाही, अशी टीका भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केली.
अनिल बोंडे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशात आता डोळा मारणारे दोन नेते झाले आहेत. एक म्हणजे राहुल गांधी आणि दुसरे अजित पवार. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमधील नेते गंभीरपणे घेत नाही, त्यामुळे ते अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत असताना अजित पवार डोळा मारून फार गंभीरपणे घेऊ नका, असे सांगतात. फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांना आणि समाजाला न्याय देणारा असल्यामुळे विरोधकांनासुद्धा प्रतिक्रिया देताना चांगले बोलावे लागत आहे. फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे.
हेही वाचा – रेल्वेत तिकीट ‘कन्फर्म’ तरीही आरक्षित जागेसाठी लढा कायम; रेल्वे मंत्रालय देणार का लक्ष?
हेही वाचा – नागपूर : लग्न ठरवण्यासाठी घरी पाहुणे आले अन् मुलीने कॉलेजमध्ये..
आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना जाहीर करून साधी दमडी तरी दिली का, असा प्रश्न बोंडे यांनी उपस्थित केला. ४० हजार लोकांच्या सूचना आल्यानंतर त्या सूचनांचा अंतर्भाव करत हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. नागपूर शहरसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, असे ते म्हणाले.