नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद उमटत असून सत्ताधारी भाजपने ही घटना बनावट असल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या या आरोपाला सलील देशमुखांसह महाविकास आघाडीने प्रत्युतर दिले असून भाजपनेच हल्ला घडवल्याचा आरोप केला आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील निवासस्थानी आज पत्रपरिषदेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील म्हणाले, काटोलमधून अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने चरणसिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. ठाकूर हे कंत्राटदार असून भाजपचे माजी मंत्री परिणय फुकेंचे व्यावसायिक भागीदार आहेत आणि फुके हे भाजपमधील सर्वोच्च नेत्यांच्या जवळचे आहेत.

ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?

हेही वाचा : ५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

मागील ३० ते ३५ वर्षांच्या काळात कधीही काटोलमध्ये निवडणुकीला गालबोट लागले नाही. परंतु, फुके आणि ठाकूर यांनी यंदा भाजपचा पराभव होत असल्याचे बघत हा हल्ला घडवला. मागेही विधानसभा निवडणुकीत भाजपने साकोली मतदारसंघातून परिणय फुके यांना नाना पटोले यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. तेथेही फुके यांनी राजकीय गुंडगिरीचे दर्शन घडवल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

यावर भाजप नेते परिणय फुके म्हणाले, अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे ‘बनावट दगडफेक’ आहे. पोलिसांनी तातडीने एसआयटीमार्फत तपास करावा. सलील देशमुखांचा पराभव होणार हे लक्षात येताच ही घटना घडली. अनिल देशमुख काहीतरी नाट्य करतील, असा इशारा यापूर्वीच अनेक सभांमध्ये दिल्याचेही फुके म्हणाले.

हेही वाचा : ‘एमपीएससी’ला राज्यात विदर्भ असल्याचा विसर’, वैद्यकीय प्राध्यापक पदभरतीबाबत उच्च न्यायालयाचे ताशेरे

विरोधकांना पुरून उरणार

भाजपच्या लोकांनी दगड मारले किंवा गोळ्या झाडल्या तरी अनिल देशमुख मरणार नाही. त्यांना पुरून उरणार आहे. त्यांना सोडणार नाही, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी भाजपला इशारा दिला. उपचारानंतर मंगळवारी रुग्णालयातून घरी परतले या वेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

Story img Loader