राज्याचे माजी गृह मंत्री व राष्ट्रवादीने वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीन सर्वोच न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे देशमुख यांना ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळून उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन कायम ठेवला असला तरी देशमुख यांना मुंबई बाहेर जाता येईल काय याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- …तर आम्ही तुमचा ‘दाभोळकर’ करू, ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमकी

देशमुख यांना नागपूर आणि त्यांचा मतदासंघ काटोल येथे जामीन मिळाल्यानंतरही जाता आलेले नाही. या संदर्भात देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधले असता, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका काही संकेदात फेटाळली आहे. पण, या याचिकेचा आणि देशमुख यांना मुंबईबाहेर जाऊ देण्याचा काही संबंध नाही. उच्च न्यायालायने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार कोणत्या कार्यालयात केव्हा जायचे यासंबंधीचे निर्देश आहेत. त्याचअंतर्गंत मुंबई बाहेर आणि देशाबाहेर न जाण्याची देखील अट आहे. मात्र, मतदारसंघात जाऊन आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी देशमुख हे न्यायालयाकडून रितसर परवानगी घेतील, असेही त्यांच्या कार्यालयाने सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh barred from going to his constituency after getting bail rbt 74 dpj