नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस दलात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाच्या माध्यमातून तीन हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. हे महामंडळ सुरक्षा रक्षकांची (सेक्युरिटी गार्ड) भरती करते. राज्य सरकार सुरक्षा रक्षकांना पोलिसांची जबाबदारी देणार आहे का, असा प्रश्न करीत हा निर्णय रद्द करण्याची मागणी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नागपूर : हलबा समाजावर अन्याय, राष्ट्रीय आदिम कृती समितीचे आज आंदोलन

हेही वाचा – “निवडणुकीत पराभवाच्या भीतीने कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका, म्हणाले…

देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी ‘सेक्युरीटी गार्ड’ला पोलीस म्हणून पोलीस खात्यात भरती करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचा निषेध आहे. पोलीस भरती होणार म्हणून अनेक तरुण – तरुणी गेल्या तीन वर्षांपासून तयारी करीत आहेत. परंतु पोलीसमध्ये कंत्राटी भरती करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. पोलीस विभागाकडे अनेक मोठ्या गुन्ह्याचा तपास करण्याचे काम असते. अशा महत्त्वाच्या खात्यात सेक्युरिटी गार्डला कंत्राटी पद्धतीवर भरती करून राज्यामधील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम राज्य सरकार करणार काय, असा प्रश्नसुद्धा अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh commented on police recruitment criticized devendra fadnavis rbt 74 ssb