नागपूर : राज्यात पावसाने दांडी मारल्याने व नंतर अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर तातडीने मदतीची आवश्यकता असताना सरकार विरोधी पक्ष फोडाफोडीत व्यस्त आहे, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
हेही वाचा – बौद्ध धर्माकडे वाढता कल, २५ हजार नागरिक घेणार बौद्ध धम्माची दीक्षा
विधानसभेत हा आवाज उठविल्यानंतर राज्य सरकारने बऱ्याच उशिरा पंचनामे सुरू केले. शेवटी पंचनामे पूर्ण झाले आणि राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ हजार ७१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन देण्यात आले. परंतु अद्यापही ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास २ लाख शेतकऱ्यांची २०४ कोटी रुपयांची मदत येणे बाकी आहे. राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांचा दसरा तर अंधारातच गेला आहे, आता दिवाळीसुद्धा अंधारातच जावू देणार का? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी सरकारला विचारला.