नागपूर : अनिल देशमुख हे सुरुवातीपासून फॅशनेबल नेते असून केवळ काही तरी आरोप करायचा म्हणून आणि नवा ट्रेंड म्हणून पेन ड्राइव्ह दाखवत आहे. पण त्यात काहीच नाही. त्या पेन ड्राइव्हमध्ये काही असेल तर ते जनतेसमोर दाखवा अन्यथा त्यांची ओळख ही केवळ फॅशनेबल नेता म्हणून जनतेसमोर येईल, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशीष देशमुख प्रसार माध्यामांशी बोलत होते. अनिल देशमुख यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी केवळ फॅशन म्हणून पेन ड्राइव्ह प्रसार माध्यमांना दाखविला आहे. मात्र त्यात काही असेल तर ते जनसेसमोर आणले पाहिजे. तो पेन ड्राइव्ह करप्ट झाला असून त्यात काही नाही. दोन वर्षांनंतर ते पेनड्राइव्ह दाखविण्याचे कारण म्हणजे केवळ देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करणे आहे. मात्र अनिल देशमुख यांच्या विरोधात अनेक पेनड्राइव्ह आमच्याकडे आहे. फॅशनेबल नेता म्हणून अनिल देशमुख यांची ओळख ते जमिनीवर काम करणारे नेते नाहीत.

हेही वाचा – गडचिरोली : भोंगळ कारभार! पहिलाच पाऊस अन एक हजार कोटींचे रस्ते उखडले…

पेनड्राइव्हमध्ये काय पुरावे आहे हे दाखवले पाहिजे अन्यथा त्यांची फॅशनेबल नेता म्हणून समाजात ओळख असेल, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली. काटोल मतदारसंघात त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे त्यामुळे त्यांच्यावर नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे. ते दक्षिण पश्चिमवर डोळा ठेवून असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी आणि त्यांना बदनाम करण्यासाठी व प्रसारमाध्यमांची स्पेस घेण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला. तुतारीसाठी दक्षिण पश्चिम ही जागा सोडली जाऊ शकते त्यामुळे हा अनिल देशमुख यांचा केवीलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे.

हेही वाचा – वर्धा : विधानसभा निवडणूक – वाटेकरी वाढल्याने काँग्रेस चिंतातूर

दक्षिण पश्चिममध्ये निवडणूक लढले तर त्यांची जमानत जप्त होईल त्यामुळे शाम मानव यांना समोर करुन त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात खोटे आरोप लावले आहे. काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख यांच्या विरोधात त्यांचे सुपुत्र सलिल देशमुख निवडणूक लढले तर नवल वाटू नये असेही आशिष देशमुख म्हणाले. जे त्यावेळी कारागृहात होते. त्यावेळी त्यांना चिंता होती. पण ‘काका काच के घर मे रहणे वाले, दुसरे को पत्थर नही मारते.’ दुसऱ्यांनी सांगितले म्हणून आरोप करणे योग्य नाही. कुठलेही पुरावे पहिले का? ते दाखवले नाही, त्यामुळे अनिल देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh criticizes devendra fadnavis ashish deshmukh comment on it what he say about pen drive vmb 67 ssb