वर्धा : ढोल ताशांच्या निनादात कार्यकर्ते स्वार, जोरदार घोषणाबाजी, दुतर्फा गर्दी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख चांगलेच भारावले. समुद्रपूर येथे प्रदेश सचिव अतुल वांदिले यांनी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चास चांगलीच गर्दी लोटली होती.
मोर्चा पाहून देशमुख यांनी ग्रामीण भागात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याची ही पावती होय, असे मत मांडले. मराठा समाजास आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणास बाधा येवू नये, असेही ते यावेळी म्हणाले. वांदिले यांनी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे, रानटी जनावरांचा उपद्रव, शेतमालाचे भाव, कृषीपंपाचा वीजपुरवठा, अपघातप्रवण रस्ते, आदी प्रश्न उपस्थित केले.
हेही वाचा – मराठा आरक्षण क्रांती मोर्चा: बुलढाण्यात येणाऱ्या मार्गांवर तगडा पोलीस बंदोबस्त
हेही वाचा – ‘बीआरएस’ही मैदानात! मराठा आरक्षणावर सुचविला ‘हा’ तोडगा
जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे तसेच समीर देशमुख, प्रलय तेलंग, गजानन शेंडे, अशोक वंदिले, दिनकर घोरपडे, अशोक डगवर, बबन हिंगणीकर, अशोक कलोडे, गणेश वैरागडे, संदीप किटे, ज्योती देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच विनोद कुटे तसेच संभाजी ब्रिगेडचे राजेश धोटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.