नागपूर : खोट्या आरोपाखाली तुरुंगात १४ महिने ठेऊन माझा प्रचंड छळ केला गेला. मला दहशतवादी कसाबला ठेवलेल्या इमारतीत ठेवले गेले, अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
हेही वाचा – दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते शनिवारी भारतात; मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडण्याचे नियोजन
हेही वाचा – भारतीय राज्यघटना एक असामान्य निर्मिती; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे भाष्य
ईडीच्या कारवाईनंतर तब्बल २१ महिन्यांनंतर आपल्या नागपुरातील निवासस्थानी परतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले, मला ठेवलेल्या कारागृहातील इमारतीला लोखंडाचे जाड पत्रे होते. कारागृहातील या इमारतीमध्ये पूर्वी मुंबई बाॅम्बस्फोटाचा गुन्हेगार व दहशतवादी अजमल कसाबलाही ठेवण्यात आले होते. मी कोणताही गुन्हा केला नसतांना मला कारागृहात राहावे लागल्याचे दुःख आहे. या २१ महिन्यांच्या कालावधीत मला व माझ्या कुटुंबीयांना सातत्याने मानसिक त्रास दिला गेला. पण, मला न्याय दिल्याबद्दल मी न्यायदेवतेचे आभार मानतो, असेही देशमुख म्हणाले.